Pune : सावत्र वडिलांच्या त्रासाला कंटाळून 17 वर्षीय मुलीची आत्महत्या

एमपीसी न्यूज – सावत्र वडिलांच्या त्रासाला कंटाळून 17 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि.17) हांडेवाडी रोड येथील सिल्व्हर स्टार अपार्टमेंटमध्ये घडली.

वेदिका बडदे (वय 17) असे या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने दीप्ती बडदे (वय 36, रा. हांडेवाडी रोड, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीप्ती यांचा प्रितम बदडे याच्याशी दुसरा विवाह झालेला होता. दीप्ती यांची मुलगी वेदिका ही त्यांच्या पहिल्या पतीची मुलगी होती. त्यामुळे प्रितम हा वेदीकाला चांगली वागणूक देत नव्हता. तो वेदीकाला मोबाईल वापरू देत नव्हता. प्रितमने 16 जानेवारीला वेदिकाकडे मोबाईल पाहिला. याचा त्याला भयंकर राग आला आणि त्याने वेदीकाला मारहाण करून पुन्हा तुझ्याकडे मोबाईल दिसल्यास तुझा मर्डर करेन अशी धमकी सुद्धा दिली. एवढेच नाही तर वेदीकाची आई प्रीतम हिच्यावर देखील वारंवार संशय घेऊन त्यांना मारहाण आणि शिवीगाळ करायचा. त्याने स्वतः देखील वेदीकाच्या आईची कोणतीही परवानगी न घेता दुसरे लग्न केले. अखेर या त्रासाला कंटाळून वेदीकाने गळफास घेऊन स्वतःला संपवले.

याप्रकरणी सावत्र वडील प्रितम बडदे याच्यावर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध वानवडी पोलीस घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.