Pune: मानसिक तणावातून धायरी येथील व्यावसायिकाची आत्महत्या

Pune: Suicide of a businessman from Dhayari due to mental stress मानसिक तणावातून रायकर यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रायकर हे मंडप व्यावसायिक होते.

एमपीसी न्यूज- सुखसागरनगर भागात दोन चिमुकल्यांचा खून करून आई-वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच पुण्यात आणखी एक आत्महत्येचा प्रकार समोर आला आहे. सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात एका व्यावसायिकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज (दि.19) सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.

स्वप्नील उत्तम रायकर (45, रा. शिव मल्हार नगर, रायकर मळा, धायरी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मानसिक तणावातून रायकर यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रायकर हे मंडप व्यावसायिक होते.

रायकर यांनी मानसिक तणावातून हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्यरात्री 2 च्या सुमारास त्यांनी गळफास घेतल्याचे सांगितले जात आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.