Pune: आत्महत्यांचे सत्र सुरूच; कोरोनाच्या भीतीने रिक्षाचालकाची कॅनॉलमध्ये उडी मारुन आत्महत्या

Suicide season continues; Rickshaw driver commits suicide by jumping into canal

एमपीसीन्यूज : मागील काही दिवसांपासून सुरू असलेले पुण्यातील आत्महत्यांचे सत्र काही थांबताना दिसत नाही. सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका रिक्षाचालकाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. सिंहगड रस्त्यावरील एका कॅनॉलमध्ये त्याचा मृतदेह सापडला. मृतदेहाच्या खिशात चिट्ठी सापडली असून कोरोनाच्या धास्तीने आत्महत्या करीत असल्याचे त्यात नमूद केले आहे.

अनिल बाबुराव खाटपे (वय 54) असे रिक्षाचालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सिंहगड रस्त्यावरील कॅनॉलमध्ये मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाचा खिशात चिट्ठी सापडली असून त्यात “कोरोना आजार होऊन हालहाल होऊन मरण्यापेक्षा मी आत्महत्या करीत आहे” असा उल्लेख आहे.

अनिल खाटपे धायरीतील गारमाळ परिसरात कुटुंबियांसह राहत होते. त्यांना दोन मुले आहेत. लॉकडाऊनमुळे मागील काही दिवसांपासून ते चिंतेत होते. सिंहगड पोलिसात याप्रकरणी आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे शहरात मागील पाच दिवसात तब्बल 11 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. कोरोना विषाणूशी सामना करीत असताना अशााप्रकारे मोठ्या संख्येने आत्महत्या होणे धक्कादायक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.