Pune : रंगभूषाकार सुजित सुरवसे यांचा ‘समाजगौरव’ पुरस्काराने सन्मान

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलनात फिल्म मेकअप आर्टिस्ट सुजित सुरवसे याला ‘समाजगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुण्याच्या मान्यवरांच्या यांच्या हस्ते सुजितला गौरविण्यात आले.

पुणे येथे रविवारी (दि. 29) अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये रंगभूषाकार सुजित सुरवसे याला ‘समाजगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ साहित्यिक टी. एस .चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिक – श्रीमंत कोकाटे वडार पँथरचे अध्यक्ष माजी नगरसेवक दयानंद इरकल, उद्योजक – नितीन धोत्रे, माजी सैनिक बजरंग चौगुले, आंतराष्ट्रीय बॉक्सींग खेळाडू राहुल धोत्रे, चित्रपट निर्माते रमेश पवार, अशोक पवार, हरिष बंडीवडार, मोनिका चौगुले उपस्थित होते.

सुजित सुरवसे याने आजपर्यंत हिंदी ,मराठी ,साऊथ अशा विविध चित्रपटांमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केले आहे. नामांकित कलाकारांची रंगभूषा केली आहे. सुजितला काही पुरस्कार देखील मिळाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.