Pune : ‘लॉकडाऊनमधील वाढते कौटुंबिक हिंसाचार’ या विषयावर रविवारी लाईव्ह व्याख्यान

एमपीसी न्यूज – अभिव्यक्ती संघटनेतर्फे लॉकडाऊन कालावधीत वाढते कौटुंबिक हिंसाचार या विषयावर लाईव्ह व्याख्यान रविवारी (दि.10) रोजी संध्याकाळी 5.00 वा.  आयोजित करण्यात आले आहे.

अभिव्यक्ती संघटनेच्या फेसबुक पेज- abhivyakti.pune व युट्युब चैनल – Lokayatpune वर जाऊन या व्याखानाचा आस्वाद नागरिकांना घेता येणार आहे. या व्याख्यानासाठी सामाजिक कार्यकर्त्या अलका जोशी प्रमुख वक्त्या म्हणून व्याख्यान देणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लाॅकडाऊन लागू करण्यात आला. लाॅकडाऊन कालावधीत महिलांवरील अत्याचार तसेच कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण वाढल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. याबाबत सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन अलका जोशी करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.