Pune : कर संकलन विभागातील कर्मचारी सुनील कांबळे यांचे निधन

Sunil Kamble, an employee of the tax collection department, passed away

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागातील कर्मचारी सुनील तात्याराम कांबळे (वय 56) यांचे मंगळवारी उपचारादरम्यान निधन झाले. धानोरी येथील स्मशानभूमीत बुधवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. रविवारी दुपारी धानोरी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते जखमी झाले होते. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी त्यांचे निधन झाले.

त्यांच्या निधनानिमित्त मनपाच्या विविध विभागातील कर्मचारी, अधिकारी, मनपा कर आकारणी व कर संकलन विभाग, प्रेसमधील सहकारी, ताडीवाला रस्ता, विश्रांतवाडी, धानोरी परिसरातील नातेवाईक, मित्रपरिवार यांना मोठा धक्का बसला आहे.

सुनील कांबळे पुणे महापालिकेच्या मनपा मुद्रणालयात 1993 साली फोरमन या पदावर कायमस्वरूपी सेवेत रुजू झाले. मनपाच्या कर आकारणी व कर संकलन विभागातील मिळकतींचे फॉर्म अद्ययावत करणे, संगणकीय कामकाजाच्या कौशल्यावर आणि प्रिंटिंग क्षेत्रातील सखोल ज्ञान, प्रदीर्घ अनुभव होता.

त्यांनी मिळकतींची बिले आणि संगणकीय सुधारणा करण्यात मोलाची कामगिरी केली. इतरांना व मनपात येणाऱ्या नागरिकांना त्यांनी मार्गदर्शन केले, अशी माहिती पुणे महापालिकेतर्फे देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.