BNR-HDR-TOP-Mobile

Pune : सुपर इलेव्हन, एक्सलन्सी अ‍ॅकॅडमी, इनकम टॅक्स् संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पोर्टस्, सोशल अँड कल्चरल अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धा

एमपीसी न्यूज – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पोर्टस्, सोशल अँड कल्चरल अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धेत सुपर इलेव्हन, एक्सलन्सी अ‍ॅकॅडमी आणि इनकम टॅक्स् संघ, पुणे या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरू नगर-पिंपरी येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सुपर इलेव्हन संघाने आपली विजयी घौडदौड कायम ठेवताना राजा बंगला एससी संघाचा ७-० असा धुव्वा उडविला. सुपर संघाच्या विजयात रोहन पवार याने तीन गोल, अमोल भोसले याने दोन तर, रोशन मुसळे आणि क्रिष्णा मुसळे यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.

  • अर्थव काबळे याच्या कामगिरीच्या जोरावर इनकम टॅक्स्, पुणे संघाने रोव्हर्स अ‍ॅकॅडमीचा ९-३ असा पराभव करून उपांत्यपुर्व फेरी गाठली. इनकम टॅक्स् संघाच्या अर्थब कांबळे याने चार गोल करून विजयात महत्वपूर्ण वाटा उचलला. प्रदीप मोर याने दोन तर, आशिष छेत्री, सोनु दलाल व संतोष कस्तुरे यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.

एक्सलन्सी अ‍ॅकॅडमीने आपला विजयी फॉर्म कायम ठेवताना पीसीएमसी इलेव्हन संघावर ७-१ असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम चार संघांमध्ये आपले स्थान निश्‍चित केले. एक्सलन्सी संघाकडून सर्व खेळाडूंनी विजयात आपला हातभार लावला. ७ खेळाडूंनी यांनी प्रत्येकी एकेक गोल केला यामध्ये राजेंद्र पवार, विनीत कांबळे, मोनिष चव्हाण, रोमेश पिल्ले, गणेश पाटील, सतिश पाटील व शशिकांत बी. यांचा समावेश होता.

  • स्पर्धेचा सविस्तर निकालः
    सुपर इलेव्हनः ७ (रोहन पवार १४, २४, ४८ मि.; रोशन मुसळे ३४ मि., अमोल भोसले ४४, ५८ मि., क्रिष्णा मुसळे ५० मि.) वि.वि. राजा बंगला एससीः ०;

इनकम टॅक्स्, पुणे : ९ (अर्थब कांबळे १२, १९, ४४, ४७ मि., प्रदीप मोर १४, ४० मि., आशिष छेत्री १७ मि., सोनु दलाल ५२ मि., संतोष कस्तुरे ५९ मि.) वि.वि. रोव्हर्स अ‍ॅकॅडमीः ३ (सुफियान शेख २५ मि., राहूल रसाळ ४९, ५६ मि.); हाफ टाईमः ४-१;

  • एक्सलन्सी अ‍ॅकॅडमी : ७ (राजेंद्र पवार १ मि., विनीत कांबळे ४ मि., मोनिष चव्हाण ५ मि., रोमेश पिल्ले १४ मि., गणेश पाटील ३७ मि., सतिश पाटील ३९ मि., शशिकांत बी. ४४ मि.) वि.वि. पीसीएमसी इलेव्हनः १ (अभिषेक माने १९ मि.); हाफ टाईमः ४-१.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3