Pune: फळभाज्यांची आवक स्थिर; दरात 10 ते 20 टक्क्यांनी घट

Pune: supply of fruits and vegetables stabilized; 10 to 20 percent reduction in rates शेवगाच्या भावात वाढ झाली असून, मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत

एमपीसी न्यूज – पुणे मार्केटयार्डात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असून, भाज्यांना उठाव नाही. टोमेटो, भेंडी, दोडका, हिरवी मिरची, काकडी, कारली, कोबी, घेवडा, दुधी भोपळी, पडवळ, फ्लॉवर, कोबी, ढोबळी मिरची, बीट व पावटाच्या भावात सुमारे 10 ते 20 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. शेवगाच्या भावात वाढ झाली असून, मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत, अशी माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी रविवारी दिली.

आज बाजारात 90 ट्रक शेतमालाची आवक झाली. परराज्यातून आलेल्या मालामध्ये कर्नाटक येथून 100 पोती मटार, गुजरात, कर्नाटक येथून 4 ते 5 टेम्पो कोबी, इंदूर येथून 7 ते 8 टेम्पो गाजर, आंध्र प्रदेश, तामिळनाडू व कर्नाटक येथून 10 ते 12 टम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथून शेवगा 2 ते 3 टेम्पो आणि कर्नाट्‌क येथून 3 टेम्पो घेवडा इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून सातारी आले 1000 पोती, कोबी 5 ते 6 टेम्पो, फ्लॉवर 7 ते 8 टेम्पो, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, ढोबळी मिरची 7 ते 8 टेम्पो, भेंडी 7 ते 8 टेम्पो, गवार 6 ते 7 टेम्पो, टोमॅटो 1500 पेटी, काकडी 7 ते 8 टेम्पो, भुईमूंग शेंग 150 गोणी, मटार 150 गोणी, तांबडा भोपळा 7 ते 8 टेम्पो, कांदा 30 ट्रक, आग्रा आणि इंदूर येथून 30 ट्रक बटाटा, गुजरात आणि मध्यप्रदेश येथून 7 ते 8 ट्रक लसूण इतकी आवक झाली आहे

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : 60-80, बटाटा : 200-250, लसूण : 700-1100, आले : नविन – 100-200, जुने आले – 300-400, भेंडी : 100-160, गवार : 300-400, टोमॅटो : 100-160, दोडका : 150-200, हिरवी मिरची : 100-200, दुधी भोपळा : 80-100, चवळी : 100-150, काकडी : 60-100, कारली : हिरवी 150-200, पांढरी 90-100, पापडी : 150-160.

पडवळ : 100-150, फ्लॉवर : 120-180, कोबी : 50-100, वांगी : 200-250, डिंगरी : 140-150, नवलकोल : 80-100, ढोबळी मिरची : 200-250, तोंडली : कळी 250-300, जाड : 90-100, शेवगा : 500-600, गाजर : 150-200, वालवर : 300-320.

बीट : 60-80, घेवडा : 200-250, कोहळा : 100-120, आर्वी : 100-150, घोसावळे : 140-150, ढेमसे : 180-200, पावटा : 300-350, भुईमूग शेंग : 300-350, मटार : स्थानिक – 700-800, परराज्य 600-650, तांबडा भोपळा : 60-100, सुरण : 260-280, मका कणीस : 60-100, नारळ (शेकडा) : 1000-1600.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.