Pune : दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदत

एमपीसी  न्यूज – स्टुंडट हेल्पिंग हॅन्ड या संस्थेमार्फत दुष्काळग्रस्त विद्यार्थी विद्यार्थी परिषदचे आयोजन केले आहे. दुष्काळग्रस्त मराठवाडा, विदर्भातून आलेल्या गरीब तसेच मागास विद्यार्थ्यांना मूलभूत सोयी सुविधा मिळावी, ज्या विद्यार्थ्यांना पालक नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व जेवणसाठीचे अर्थसाहाय्य करण्यासाठी ही संस्थेने परिषदेचे आयोजन केले आहे .

तसेच इतर विद्यार्थ्यांना अल्प दरात राहण्याची तसेच त्यांना शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी हि संस्था मदत करणार आहे. आत्तापर्यंत संस्थेने 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मदत केली आहे .या संस्थेचा 1000 विद्यार्थ्यांपर्यंत जाण्याचा मानस ठेवण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम 12 डिसेंबर 2018 रोजी पंडित नेहरू सभागृह, बालगंधर्व चौकाजवळ, घोले रोड येथे होणार आहे .या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक रोहित पवार (जि. प. सदस्य,पुणे ) असून, प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार डॉ.विश्वजीत कदम,उपाध्यक्ष एम.आय.टी चे राहुल कराड , कॅग कमिटी सदस्य राज देशमुख फोरसाईट ग्रुपचे ॲडव्हायझर सचिन ईटकर हजेरी लावणार आहेत.

या कार्यक्रमाप्रसंगी विविध विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप वाटप करण्यात येणार आहे. जर आपल्याला गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत करायचे असल्यास संस्थेने आपल्या बँक डिटेल्स  “Student Helping Hands”या संस्थेचे IFSC -SBIN0001110 account no.-38106918453 या अकाउंट वर तुम्ही मदत करू शकता असे ,आवाहन संस्थेचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर, यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.