Pune : दिव्यांग-ज्येष्ठांच्या हक्कासाठी सुप्रिया सुळे यांचा आंदोलनात सहभाग

एमपीसी न्यूज : केंद्र सरकारच्या (Pune) वयोश्री योजनेअंतर्गत जेष्ठ नागरिकांना व ADIP योजनेअंतर्गत दिव्यांगांना सहाय्यभूत साधने वितरणात केंद्र सरकारकडून दिरंगाई होत आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सुप्रिया सुळे यांनीही सहभाग घेतला.

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या माध्यमातून डिसेंबर 2021 ते मार्च 2022 दरम्यान पुणे जिल्ह्यात तालुकानिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यात जवळपास विक्रमी 1 लाखांपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरीक आणि दिव्यांगाची तपासणी करण्यात आली. त्यांना सहाय्यभूत साधने देण्यासाठीच्या स्लीप देण्यात आल्या. पण वर्षभराचा कालावधी उलटून गेल्यानंतरही केंद्र सरकारकडून या साधनांचे वितरण झाले नाही.

याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री विरेंद्र कुमार यांच्याकडे साधनांच्या वितरणासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. पण अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेण्यात न आल्याने जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग लाभार्थी त्यांच्या हक्कांच्या साधनांपासून वंचित आहेत.

Pakistan : पाकिस्तानमध्ये मशिदीमध्ये बॉम्बस्फोट; 32 जण ठार

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांना नम्र विनंती (Pune) आहे की, कृपया शासनाने यावर तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा आम्हाला यासाठी दिल्लीत आंदोलन करावे लागेल, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

या आंदोलनावेळी जयदेव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, वैशाली नागवडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे जिल्हा अध्यक्ष भारती शेवाळे, महिला शहराध्यक्ष मृणालिनी वाणी, जेष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.