Pune : सुप्रिया ताईंनी लोकांची दिशाभूल करण्याचे काम केले – विजय शिवतरे

एमपीसी न्यूज : पुरंदर विधानसभा मतदार संघातील जांभुळवाडीतील (Pune) कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्या आरोपावर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत विजय शिवतरे म्हणाले की, मी मंत्री पदावर असताना पाच कोटींचा निधी जांभुळवाडीतील कामासाठी मंजूर केला होता. त्यानंतर तेथील काम लोक सहभागातून देखील केली आहेत.

तेथील काम राष्ट्रवादीच्या एका कॉन्ट्रॅक्टरल मिळाले होते. तिथे त्याने काही काम केले नाही. त्यामुळे त्या कामाचा निधी पुन्हा राज्य सरकारकडे गेला. तसेच, या कामाचे भूमिपूजन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले.

Nigdi : देवदत्त फोटोग्राफी स्कूल आणि गुडलक कॅफे तर्फे ‘फोटो कट्टा’चे आयोजन

तसेच ते पुढे म्हणाले की, लोकांना गंडवणे, लोकांची दिशाभूल करणे, माहिती न घेणे, फसवाफसवी (Pune) काम सुप्रिया ताईंनी केले  असल्याचा आरोप यावेळी विजय शिवतरे यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.