Pune : सर्वांगीण विकासाच्या शिक्षणावर भर देणाऱ्या ‘सूर्यदत्ता’चे कार्य अनुकरणीय – अभिनेत्री माधुरी दीक्षित

सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा उत्कृष्ट शिक्षणसंस्था म्हणून गौरव

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कौशल्याभिमुख आणि मूल्याधिष्ठित शिक्षण देणाऱ्या सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला
सर्वांगीण विकास आणि अनुकरणीय शिक्षणातील उत्कृष्ट शिक्षणसंस्था म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. ब्रँड आयकॉन प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने आयोजिलेल्या ‘ग्लोबल बिझिनेस अवॉर्ड्स 2019’ या पुरस्कार सोहळ्यात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगादानाबद्दल सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. ही निवड अतिशय योग्य
असून, सर्वांगीण विकासाचे शिक्षण देण्यावर भर देणाऱ्या ‘सूर्यदत्ता’चे कार्य अनुकरणीय आहे, अशा शब्दात माधुरी दीक्षित यांनी गौरव केला. मुंबई
येथे झालेल्या सोहळ्यावेळी मॉडेल-अभिनेत्री गोहर खान, अभिनेता नकुल मेहता, अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा, अभिनेत्री ग्रेसी सिंग, प्रेरक वक्ता
सिमरजित सिंग, सजल जोतिष शास्त्री, उद्योगपती हरिनाथ सिंह यांच्यासह विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘ग्लोबल इंडिया अवार्ड्स’ देऊन सन्मानित करण्यात आले.

या 20 वर्षांच्या कालावधीत सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. ब्रँड आयकॉन
प्रायव्हेट लिमिटेड द्वारा आयोजित ग्लोबल बिझिनेस अवॉर्ड्स 2019 मध्ये ‘होलिस्टिक डेव्हलपमेंट अँड इंडिप्लॉईडरी कंट्रीब्यूशन टू इंडियन
एज्युकेशन फॉर इंडिया’ या पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्टतेचे प्रमाणपत्र मिळाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.