Pune : बाणेरमध्ये एलइडी टीव्ही चोरणारा संशयित अटकेत

पोलिसांनी निलायम चौकात पोलीस गस्तीमध्ये संशयिताला पकडले

एमपीसी न्यूज – पोलीस गस्त घालत असताना निलायम चौकात एलइडी संशयित चोरट्यास पोलिसांनी पकडले. शेरसिंग शेरावत (वय 22 वर्ष,राहणार संतूर अपार्टमेंट,बालेवाडी,पुणे) असे त्याचे नाव असून तो मूळचा गाव चमोली, जिल्हा रुद्रप्रयाग,राहणार उत्तराखंड येथील आहे. त्याच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने बाणेर येथील एलइडी टीव्ही चोराला असल्याचे सांगितले. त्याला पोलिसांनी अटक केली आहे, असे, दत्तवाडी पोलिस स्टेशन पुणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, सध्या रस्त्यावरील चोऱ्या रोखण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनकडून पोलीस गस्त मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. ह्या गस्तीमुळे रस्त्यावर होणारे गुन्हे कमी होण्यास मदत होत आहे.

  • दत्तवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ आपल्या पथकासह विजयानगर, निलायम टॉकीज चौक पर्वती जनता वसाहत या भागात पायी गस्त घालत आसतांना निलायम चौक येथे एक इसम स्वतःकडे एलइडी टीव्ही संच घेऊन जात असलेला दिसला.

त्याच्या संपूर्ण हालचालीवरून त्याच्याबाबत संशय आल्याने त्याची चौकशी केली असता त्याने दिनांक 24 जुलै रोजी इटरीट हॉटेल बाणेर येथून पहाटे टीव्ही चोरला असल्याचे त्याच्या चौकशीत समजले. त्याचे नाव विचारता त्याने स्वतःचे नाव लकी शेरसिंग शेरावत (वय 22 वर्ष,राहणार संतूर अपार्टमेंट,बालेवाडी,पुणे) असे सांगितले असून त्याचे मूळ गाव चमोली, जिल्हा रुद्रप्रयाग,राहणार उत्तराखंड असे आहे. त्याला अटक करण्यात आले आहे.

  • ह्या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ,पोलीस हवालदार तानाजी निकम,राजू जाधव,पोलीस नाईक सुधीर घोटकुले,पोलीस कॉन्स्टेबल सागर सुतकर यांनी सहभाग घेतला आहे.ह्यामध्ये चतुशृंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद होता, तो उघड झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.