Pune : अकराव्या मजल्यावरून कोसळल्याने एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू!; तिघेजण पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – पुण्यात अकराव्या मजल्यावरून खाली कोसळल्याने एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, पैशाच्या वादातून झालेल्या झटापटीत हा खून झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे. कोंढवा खडी मशीन येथील पूल हौसिंग सोसायटीत ही घटना घडली.

सागर चिलेवरी (वय 24) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत चिलेकरी याने आरोपीकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू होता. दरम्यान, आज सकाळी आरोपी पैसे घेण्यासाठी चिलेकरी याच्याकडे आले होते. यावेळी त्यांच्यात परत वाद झाला आणि झटापटही झाली. यातच चिलेवरी 11 व्या मजल्यावरून खाली कोसळले. यातच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत खून झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.