Pune : स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या बैठकीला सर्वपक्षीय नगरसेवकांची दांडी

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या जुन्या सभागृहात बुधवारी दुपारी आयोजित केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या बैठकीला सर्वपक्षीय नगरसेवकांनी दांडी मारली. बोटावर मोजण्या इतकेच नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे या नगरसेवकांना शहर स्वच्छ राहावे याचे किती गांभीर्य आहे ते स्पष्ट झाले.

_MPC_DIR_MPU_II

प्रशासन करीत असलेल्या सर्वच ओडीएफ ++,बेस्ट टाॅयलेट, ५ स्टार रेटींग व गार्बेज फ्रि सिटी, ब्युटीफिकेशनचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. महापौर कार्यालयाकडून नगरसेवकांना उपस्थित राहण्यासाठी पत्र पाठविण्यात आले होते. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, अतिरिक्त आयुक्त शंतनु गोयल, मनसेचे गटनेते वसंत मोरे, आरपीआय (आठवले गट) च्या गटनेत्या सुनीता वाडेकर, अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ सर्वेक्षणचा डंका वाजवीत आहेत. पण, महापालिका नगरसेवकांमध्ये मात्र अनुत्साह दिसून येत आहे.

महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत 12 कोटी रुपये वाहनतळ विकासाचे वर्गीकरण करण्यात आले. हे पैसे स्वच्छ सर्वेक्षणसाठी वापरण्यात येणार आहेत. शहरातील स्वच्छतागृहांची रंगरंगोटी करण्यात येणार आहे. इंदौर शहर स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सलगतेने यशस्वी होण्यामागील महत्वाचा भाग आहे. त्याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. या शहरातील नागरिक व लोकप्रतिनिधींचा असलेला पाठिंबा, केवळ इंदौरच नाही तर मागील वर्षी अव्वल मानांकन मिळविलेल्या सर्वच महापालिका, म्हैसूर, भोपाळ, अहमदाबाद या सर्वच शहरातील नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी स्वच्छ स्पर्धेत सक्रीय सहभाग घेतला. त्याची माहिती या सादरीकरणादरम्यान देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.