Pune : नवज्योतसिंग सिद्धू यांच्या ‘त्या’ विधानाचे स्वामी अग्निवेश यांच्याकडून समर्थन

मंत्री, करोडपती, अरबपती यांची मुले सैन्यात भरती होत नाहीत; मतदार जागृती परिषदेत व्यक्तव्य

एमपीसी न्यूज – पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग  सिद्धू यांनी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याबाबत एका व्यक्तीच्या कृत्याला संपुर्ण देश जबाबदार कसा? हे वक्तव्य केले होते. त्याचा सर्वत्र निषेध होत आहे. परंतु स्वामी अग्निवेश यांनी या वक्तव्याचे समर्थन केले असून संपूर्ण देशाला जबाबदार धरण्यापेक्षा हा हल्ला करण्यामागे जी शक्ती आहे. त्याचे समुळ उच्चाटन करण्याची गरज असल्याचे मत स्वामी अग्निवेश यांनी व्यकत केले.

मतदार जागृती परिषद आयोजित ‘लोकसभा निवडणूक आणि देशासमोरचे आव्हान’ या विषयावर सभेचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी हे होते. तर स्वामी अग्निवेश, तीस्ता सेटलवाड, निवृत्त न्या.पी.बी. सावंत, गिरीधर पाटील, निरंजन टकले हे देखील यावेळी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II
  • यावेळी स्वामी अग्निवेश म्हणाले की, जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मीडियासमोर इंटरव्यू दिला तेव्हा या आत्मघाती हल्ल्या बाबत आमची चूक झाली असे मान्य केले. आत्मघाती हल्ला करणाऱ्या काश्मीरचा नागरिक आहे. जर सर्व बाजूंनी पहारा असेल तरीसुद्धा 300 किलो वजनाची स्फोटके घेऊन आत्मघाती हल्ला कसा होऊ शकतो? याबाबत चौकशी झाली पाहिजे.

दहशतवादाला मुळासकट उखडून टाकले पाहिजे. पंतप्रधान यांनी सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर सर्व दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केल्याचा दावा केला होता. परंतु मागील चार ते पाच वर्षात खूप हल्ले वाढले आहेत. सैन्यदलात जाणारे जास्तीत जास्त मुले ही शेतकरी, मजदूर वर्गाची आहेत. जी दारिद्र्य रेषेखाली येत आहेत. जेवढे जवान शहिद झाले ती गरिबांची मुले आहेत. एमपी, एमएलए, मंत्री, करोडपती, अरबपती यांची मुले सैन्यात भरती होत नाहीत. देशभक्तीचा मक्ता काय फक्त गरिबांनाच उचलला आहे की काय? सुरक्षा कोणाची होत आहे? भ्रष्ट नेत्यांच्या सुरक्षेसाठी करोडो रुपये खर्च होत असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.