Pune : गोगावले स्वामी मठात स्वामी समर्थांचा प्रकट दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज : आज चैत्र शुद्ध द्वितीया, शोभनना म संवत्सर म्हणजेच अक्कलकोटचे (Pune) श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिन. या निमित्ताने मंगळवार पेठमध्ये गोगावले मठामध्ये स्वामी समर्थ जयंती उत्सव सोहळा उत्साहात व भक्तीभावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी मठामध्ये अनेकविध फुलांची सजावट आणि आरास करण्यात आली. जयंती आधीच्या सप्ताहात विणाजप, श्री स्वामी चरित्र महिमा पोथीचे पारायण झाले. या मठात स्वामी जयंती ते स्वामी पुण्यतिथीपर्यंत लेखी जप होत असतो.
Alandi : आळंदी नगरपरिषदेची दिव्यांगांना मदत 112 जणांना प्रत्येकी 3000 वितरित
आज दुपारी मठातर्फे सर्व भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. मठातील सर्व लहानथोर सेवेकरी यांनी महाप्रसादासाठी उत्तम व्यवस्था ठेवली होती. या वर्षी गोगावले मठास श्री स्वामी समर्थ सेवेची आणि स्थापनेची 50 वर्षे पूर्ण होत आहेत.
प्रताप गोगावले आणि अपर्णा गोगावले हे स्वामी मठात अविरत सेवा करत आहेत. सायंकाळी देखील (Pune) दर्शनास स्वामी भक्तांची गर्दी होती.