Pune News : बेळगाव तोडफोडीचे पुण्यात पडसाद, स्वारगेट स्थानकात कर्नाटकच्या बसेसवर ठाकरे गटाकडून ‘जय महाराष्ट्र’ची रंगरंगोटी

एमपीसी न्यूज : कर्नाटकमधील बेळगाव येथील हिरेबागवाडी टोल नाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये सहा गाड्याच्या काचा फोडल्या आहेत.(Pune News) या प्रकरणाचे पडसाद आता पुण्यात उमटले असून या घटनेच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी पुण्यातील स्वारगेट परिसरात कर्नाटकच्या गाड्यांना काळे फासले. इतकच नाही तर कर्नाटक महामंडळाच्या बस गाड्यांवर जय महाराष्ट्र लिहून कर्नाटक सरकारचा निषेध केला.

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत सीमावाद पेटला आहे. मंगळवारी दुपारी कर्नाटकमधील बेळगाव येथील हिरेबागवाडी टोल नाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील गाड्यांवर हल्लाबोल करत तोडफोड केली आहे. या प्रकराचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटले आहेत. पुण्यातील स्वारगेट बस डेपोत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कर्नाटकच्या वाहनांना काळं फासलं आहे. त्यामुळे कर्नाटक महाराष्ट्रातील सीमावाद आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुण्यातील स्वारगेट बस डेपोत उभ्या असलेल्या कर्नाटक पासिंगच्या गाड्यांच्या नंबरप्लेटवर काळं फासण्यात आलं आहे. हातात भगवे झेंडे घेऊन आलेल्या ठाकरे गटाच्या (Pune News) कार्यकर्त्यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा दिल्या आहेत. तसेच कर्नाटकच्या बसेसवर ‘जय महाराष्ट्र’ असं लिहून रंगरंगोटीही करण्यात आली आहे.

Pimpri News : मानवतेसाठी बाबासाहेबांची स्वातंत्र्य आणि समता ही तत्वे महत्वाची : सतीश काळे

या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सात कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविराेधात योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी सांगितले.

खरं तर, दररोज शेकडो गाड्या कर्नाटकमधून महाराष्ट्रात येत असतात आणि तेवढ्याच गाड्या महाराष्ट्रातून कर्नाटकात जात असतात. अनेकदा या गाड्या विश्रांतीसाठी पुण्यातील स्वारगेट (Pune News) बस स्थानकात उभ्या केल्या जातात. पण आता सीमावाद उफाळल्यानंतर या बसेस ठाकरे गटाच्या निशाण्यावर आल्या आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना थेट फोन करून या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

देवेंद्र फडणवीसांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन, म्हणाले…

“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दूरध्वनी केला आणि बेळगावनजीक हिरेबागवाडी येथे झालेल्या घटनेबद्दल तीव्र शब्दात आपली नाराजी नोंदविली आहे. यावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले. महाराष्ट्रातून येणार्‍या वाहनांना संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात आश्वस्त केले आहे.” अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

केंद्राला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही -शरद पवार

. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या घटनेवरून निषेध नोंदवत कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.“राज्य-कर्नाटक सीमेच्या बाबतीत झालं, ते अत्यंत निषेधार्थ आहे. केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. उद्यापासून संसदीय अधिवेशन सुरु होत आहे. राज्यातील खासदारांना सांगणार आहे, की संसदेत भूमिका मांडा. कोणी कायदा हातात घेतला, तर त्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारला घ्यावी लागेल,” असा इशारा शरद पवार  यांनी दिला आहे.

‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी – अजित पवार

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ही या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये संताप व्यक्त केला आहे. या हल्ल्याचा निषेध करताना पवार यांनी राज्य सरकारला आता ‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी असंही म्हटलं आहे.सत्तारुढ पक्षांनीही आपले कर्तव्य पार पाडावे. कोणत्याही परिस्थितीत सीमाभागात अनुचित प्रकार आणि भ्याड हल्ले खपवून घेवू नयेत. महाराष्ट्राची एकजूट दाखवण्याची हीच वेळ आहे.” अशा शब्दात अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.