Pune : स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्ग भूयारीच असणार -मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज – स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्ग हा भूयारीच असणार आहे. वरून (ऍलोवेटेड) हा मार्ग शक्य नसल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बुधवारी महापालिकेत यासंबंधी सादरीकरण करण्यात आले. या मार्गात केवळ तीनच मेट्रो स्टेशन आहेत. या मार्गासाठी 4 हजार 200 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. एकूण अंतर 5.4 किलोमीटर आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारांना दिली.

विशेष म्हणजे सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या धनकवडी – बालाजी नगर परिसरात मेट्रोचे स्टेशनच नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.  सध्या वणाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या दोन मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. हा मेट्रो मार्ग स्वारगेटवरून मार्केटयार्ड बिबवेवाडी असा वळविण्यात येणार असल्याची चर्चा होती. पण, महामेट्रोने केलेल्या डीपीआरनुसार हा मार्ग सरळ सातारा रस्त्यावरील मार्गप्रमाणे वळविण्यात आला आहे.

मंगल चौक, पद्मावती येथील शंकर महाराज मठाजवळ आणि तिसरे स्टेशन हे कात्रज येथील राजीव गांधी उद्यान येथे असेल. दरम्यान, स्वारगेट ते कात्रज मेट्रोच्या सादरीकरणा वेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सभागृह नेते धिरज घाटे, अभियंता श्रीनिवास बोनाला उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.