Pune : स्वारगेट येथील वाहनतळ महामेट्रोकडे हस्तांतरित करणार

एमपीसी न्यूज- स्वारगेट येथील राजर्षि शाहू महाराज बसस्थानकातील वाहनतळ महामेट्रोकडे हस्तांतरित केले जाणार आहे. पुढील काही दिवसांत ते जमीनदोस्त करून मेट्रो प्रकल्पसाठी जागा मोकळी केली जाणार आहे. त्यामुळे सोमवारपासून ते बंद करण्यात आले आहे.

स्वारगेट चौकाच्या बाजूला असलेल्या पाणीपुरवठा विभागाची जागा मेट्रो प्रकल्पाच्या मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हबसाठी देण्यात आली आहे. येथे पीएमपीएल, एसटी आणि मेट्रो यांचे एकत्रित ट्रान्सपोर्ट हब येथे होणार आहे. त्यामध्ये मेट्रोचे भुयारी स्टेशनही असणार आहे. या स्टेशनसाठी मेट्रोकडून शाफ्टचे काम सुरू करण्यात आले असून लवकरच भुयारी मार्गाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी या ठिकाणी असलेल्या पीएमपीएल बसस्थानकाचे नुकतेच स्थलांतर करण्यात आले आहे. आता महामेट्रोला या वाहनतळाच्या जागेची आवश्यकता आहे. त्यामुळे महामेट्रोने पालिकेकडे या जागेची मागणी केली आहे.

लवकरच हे वाहनतळ महामेट्रोकडे हस्तांतरित केले जाणार असून पुढील काही दिवसांत ते जमीनदोस्त करून मेट्रो प्रकल्पसाठी जागा मोकळी केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.