Pune : तडीपार गुंडाला पिस्तूल व दोन काडतुसासह अटक

एमपीसी न्यूज –  तडीपार कारवाई केल्यानंतरही शहरात वास्तव्य ( Pune) करणाऱ्या गुंडाला मुंढवा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली.

तेजस कृपेंद्र पायगुडे (वय 27, रा. केशवनगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पायगुडेविरुद्ध गंभीर गु्न्हे दाखल आहेत. त्यालापुणे, पिंपरी-चिंचवड शहर, जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले होते. तडीपार केल्यानंतर पायगुडे मुंढवा भागातील लोणकर पेट्रोल पंपाजवळ थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

Today’s Horoscope 04 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

पोलिसांच्या पथकाने सापळा लावून ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे सापडली. पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहायक निरीक्षक आण्णासाहेब टापरे, संतोष जगताप, दिनेश भांदुर्गे आणि पथकाने ही कारवाई ( Pune) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.