Pune: चंद्रकांत पाटील यांच्या नावाने पैसे मागणाऱ्यावर कारवाई करा- जगदीश मुळीक

Pune: Take action against those who demand money in the name of Chandrakant Patil says Jagdish Mulik चंद्रकांत पाटील यांचे खोटे नाव घेऊन कोथरूडमध्ये एक अज्ञात इसमाने एका व्यक्तीला फोन करून पैसे मागितल्याची घटना नुकतीच घडली आहे.

एमपीसी न्यूज – भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने पैसे मागणाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून केली आहे.

चंद्रकांत पाटील यांचे खोटे नाव घेऊन कोथरूडमध्ये एक अज्ञात इसमाने एका व्यक्तीला फोन करून पैसे मागितल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्या आशयाचा तक्रार अर्ज या आधीच कोथरूड पोलीस ठाण्यामधे चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

याच प्रकारची दुसरी घटना 18 जुलै 2020 रोजी निगडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडली होती. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांचा स्वीय सहाय्यक म्हणून अज्ञात इसमाने पिंपरी-चिंचवड परिसरातील एका प्रतिथयश डॉक्टर यांच्याकडे पैशाची मागणी केली होती. त्यावेळी त्या डॉक्टरांनी देखील निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली व तेथे अदखलपात्र गुन्हा नोंदवला गेला.

एकूणच हा प्रकार बघता चंद्रकांत पाटील यांची बदनामी करण्याचे एक मोठे षड्यंत्र सुरू आहे. अशाच प्रकारे लोकप्रतिनिधी यांच्या नावाचा गैरवापर करून पैसे, खंडणी मागण्याच्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून संबंधित दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी मुळीक यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.