_MPC_DIR_MPU_III

Pune : भरमसाठ बिले आकारणाऱ्या हॉस्पिटलवर कठोर कारवाई करा : महापौर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाला आदेश : Take stern action against hospitals that charge Expensive billing: Mayor

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांकडून भरमसाठ बिले आकारणाऱ्या हॉस्पिटलवर कठोर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज, मंगळवारी प्रशासनाला दिले.

_MPC_DIR_MPU_IV

महापालिकेच्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत मनसेच्या नगरसेवकांनी कोरोना रुग्णांची लूट करणाऱ्या हॉस्पिटलांवर कारवाईची मागणी केली होती.

रुग्णांची लूट करणाऱ्या हॉस्पिटलमधील मेडिकलवर कारवाई झालीच पाहिजे, सामान्य नागरिकांना लुटणाऱ्या या मेडिकेलवर कडक कारवाई करण्याची मागणी मनसेचे गटनेते वसंत मोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांनी आज महापालिकेच्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत केली.

तशा प्रकारचे फ्लेक्स आणि महागडे औषधही सभागृहात आणण्यात आले होते. मागील दोन महिन्यांपासून आपण हा विषय मांडत आहे.

_MPC_DIR_MPU_II

महापौरांनी कारवाई करण्याचे यापूर्वीही आदेश दिले होते. मात्र, काहीही उपयोग झाला नसल्याचे वसंत मोरे म्हणाले.

पुणेकरांना वाऱ्यावर सोडू नका, 40 ते 50 हजार बिले गुगल पेवरून घेणाऱ्या हॉस्पिटल विरोधात कारवाई करा, अशी मागणीही मनसेतर्फे करण्यात आली. कोरोनाचे इंजेक्शन ब्लॅकने विकली जात असल्याचा आरोप नगरसेवक अरविंद शिंदे यांनी केला.

महापौर मोहोळ म्हणाले, ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये भरमसाठ बिले आकारण्यात आली आहेत. त्या सर्व हॉस्पिटलची चौकशी करण्यात यावी.

अद्यापही या हॉस्पिटलवर पुणे महापालिकेचे नियंत्रण नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. संबंधित हॉस्पिटलमध्ये 80 टक्के बेडस ताब्यात घ्या, ऑडिट करूनच बिले देण्यात यावीत, रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयावर अधिक कठोर कारवाई करण्याचे आदेशही महापौरांनी यावेळी दिले.

यापूर्वीही अनेक सूचना केल्याची आठवणही त्यांनी प्रशासनाला करून दिली.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.