Pune : ‘राजगृह’वर हल्ला करणाऱ्या जातीवादी वृत्तीवर कठोर कारवाई करा- रिपाइं

Take stern action against racist attack on 'Rajgriha': RPI

एमपीसी न्यूज – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ बंगल्यावर झालेल्या हल्ल्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ‘रिपाइं’ पुणे शहराच्या वतीने निषेध करण्यात आला. बंगल्यातील वस्तूंची तोडफोड करणाऱ्या जातीवादी वृत्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

पुणे स्टेशनजवळील आंबेडकर पुतळा येथे ‘रिपाइं’ने निषेध आंदोलन केले.

यावेळी पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष अशोक शिरोळे, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, राष्ट्रीय निमंत्रक ॲड. मंदार जोशी, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, संजय सोनावणे, सचिव बाबुराव घाडगे, महिपाल वाघमारे, निलेश आल्हाट, किरण भालेराव, विनोद टोपे, राजेश गाडे, संतोष खरात, जितेश दामोदरे, सज्जन कवडे, मुकेश काळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यानंतर रिपाइंच्या वतीने ( आठवले गट) जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून दलितांवर अन्याय वाढले असून, आम्हाला पूजनीय असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतिस्थळावर हल्ला होणे ही निंदनीय बाब आहे.

या हल्ल्याची सीबीआयमार्फत चौकशी करून, दोषी व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, असेही या निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.