Pune – जॅमरसह गाडी नेल्याने तरूणास अटक

एमपीसी न्यूज – जॅमर लावून ठेवलेली गाडी नेल्याने तरूणास अटक केल्याची घटना सोमवारी (दि.10) दूपारी सव्वाएकच्या सुमारास कात्रज चौकात घडली आहे.याप्रकरणी भगाराम समरताराम चौधरी याला अटक करण्यात आली आहे 

याप्रकरणी बी.एच.भिंगारे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी भिंगारे हे कात्रज चौकामध्ये वाहतूक नियमनाचे काम करत असताना भगाराम समरताराम चौधरी (वय 21, रा. आंबेगाव पठार) याने सिग्नल तोडला. त्यामुळे फिर्यादीने त्याला थांबवून बाजूला घेतले. फिर्यादीने तरूणास लायसन्स आणि गाडीची कागपत्रे मागितली. तसेच त्याला यापूर्वीचा दंड देखील भरण्यास सांगितले. त्यावेळी तरूणाने दंड भरण्यासाठी त्याच्याजवळ एटीएम कार्ड नसल्याचे सांगितले. त्यामुळे फिर्यादीने त्याच्या गाडीला अडीच हजार रूपये किंमतीचा जॅमर बसवून गाडी कात्रज चौकाच्या बाजूला लावून ठेवली. परंतु तरूण त्याची गाडी तेथून घेऊन गेला.याप्रकरणी त्याच्याजवळ चौकशी केली असता त्याने गाडी त्याच्या ताब्यात असून जॅमरबाबत त्याला काहीच माहित नसल्याचे सांगितले.याप्रकरणी पोलिसांनी तरूणाला अटक केली असून पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.