Pune: जमिनीच्या हक्कपत्राची नोंद करण्यासाठी 20 हजारांची लाच स्वीकारताना तलाठ्याला पकडले रंगेहाथ

Pune: Talathi caught red-handed while accepting a bribe of Rs 20,000 to register a land title deed हवेली तालुक्यातील सोरतापवाडी येथे रामकृष्ण कारंडे हे तलाठी म्हणून कार्यरत आहेत.

एमपीसी न्यूज- सोरतापवाडी (हवेली सज्जा) येथील जमिनीचे हक्कपत्र व वाटप पत्राची नोंद घेण्यासाठी 20 हजार रुपये लाच स्वीकारताना तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. रामकृष्ण तुळशीराम कारंडे (वय 35) असे या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हवेली तालुक्यातील सोरतापवाडी येथे रामकृष्ण कारंडे हे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदारांना जमिनीचे हक्कसोड पत्र व वाटप करायचे होते. त्यासाठी त्यांनी तहसीलदार कार्यालयात अर्ज केला होता. या कामासाठी कारंडेने 40 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

तक्रारदारांनी याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती. त्यानुसार पडताळणी करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारंडे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.