Talegaon : तळेगाव दाभाडेकरांकडून पूरग्रस्तांना 11 लाख रुपयांची वस्तू रूपाने मदत

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील व्यापारी महासंघ, तळेगाव दाभाडे शहर भाजप, ओम् व्हील होंडा आणि नागरिक तळेगाव दाभाडेकडून पूरग्रस्तांना 11 लाख रुपयांची वस्तू रूपाने मदत शनिवारी (दि. 10 रोजी) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती मदत केंद्राकडे रवाना करण्यात आली.

पुनर्वसन राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे व जिल्हा भाजप अध्यक्ष गणेश भेगडे यांचे सूचनेनुसार तळेगाव शहर भाजपा कार्यालयाच्या समोर एका ट्रकमध्ये शहरातील व्यापा-यांनी, नागरिकांनी हि मदत स्वयंस्फूर्तीने जमा केली.

  • यामध्ये औषधे, बिस्कीटे, साड्या, कपडे, सॅनटरी नॅपकीन, चिक्की, टूथपेस्ट,ब्लँकेट,तेलाचे डब्बे,धान्य आदि साहित्यासह ट्रकमध्ये भरून रवाना करण्यात आली.

तळेगावातील हे साहित्य जागेवर जमा करण्यासाठी तळेगाव शहर भाजपा अध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, माजी नगरसेवक इंदरमल ओसवाल, कार्याध्यक्ष रविंद्र आवारे, नगरसेवक अरुण भेगडे पाटील,माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभूळकर,श्रीराम कुबेर,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे, सचिन जैन,भवरमल ओसवाल,शांतीलाल ओसवाल, सागर शहा, जितेंद्र रानावत, हेमंत ओंसवाल, निर्मल निबाजीया, चेतन ओंसवाल, रविंद्र माने, आनंद दाभाडे,वैभव कोतुळकर,अजय भेगडे, सचिन जाधव, लक्ष्मण माने, बंटी भेगडे, विनोद राठोड आदि पदाधिकारी व नागरिक वस्तू जमा करत होते.

  • तळेगाव शहरामध्ये मदतीचे आवाहन करताच लागलीच हि मदत प्राप्त झाली.

यामध्ये राजगुरुव कॉलनी,फ्लोरासिटी आदि कॉलनी मधील नागरिकांनी पुढाकार घेतला होता. याप्रकारे मदत गोळा करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती  मदत केंद्रावर पाठविण्यात येईल, असे शहर अध्यक्ष संतोष दाभाडे, ज्येष्ठ नगरसेवक इंदरमल ओसवाल यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.