Pune : मोदी साहेब आपण 2014 मध्ये दिलेल्या आश्वासनांवर बोला-  आनंद शर्मा

एमपीसी न्यूज- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या निवडणुकीत 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर जमा करणार, वर्षाला दोन कोटी तरुणांना रोजगार देणार ही आश्वासने दिली होती. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषणात काही बोलत नसून यासह अनेक मुद्यापासून ते पळ काढत आहेत. अशा शब्दात काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आनंद शर्मा यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पंतप्रधानावर सडकून टीका केली. मोदी साहेब आपण 2014 आश्वासनांवर बोला त्याचे काय झाले ?असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. 

आनंद शर्मा म्हणाले की, 2014 च्या निवडणुकीत मोठमोठ्या घोषणा देऊन भाजप सत्तेमध्ये आली आहे. पण त्यांना या घोषणांचा विसर पडला असल्याने देशात विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. तरुणाच्या हाताला रोजगार नाही, विकास दर घटला, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, शेतकरी वर्ग उध्वस्त झाला आहे. यामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. आमची सत्ता आल्यास आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही जे बोलतो तेच करतो पण भाजप जे बोलते ते काही करत नाही. अशा शब्दात भाजपच्या कार्यपद्धतीवर त्यांनी सडकून टीका केली.
  • भाजपने महिलांना संसदेत 33 टक्के आरक्षण असणार अशी घोषणा २०१४ च्या निवडणुकीत दिली. त्यावर मोदीनी पाच वर्षात कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. आम्ही महिलांच्या आरक्षणाच्या बाजूने असताना देखील मोदी त्यावर शांत का होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तुम्हाला लाज वाटू द्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.