Pune : ताराबाई प्रतापराव गोडसे यांचे निधन

एमपीसी न्यूज :  पुणे शहरातील श्रीमती ताराबाई प्रतापराव गोडसे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८२ वर्षे वयाच्या होत्या. 

थोर गाणपत्य स्वर्गीय प्रतापराव गोडसे यांच्या त्या पत्नी आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांच्या त्या मातोश्री होत.

त्यांच्या पार्थिवावर आज (मंगळवारी) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. गणपती मंडळांचे कार्यकर्ते, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी ताराबाई गोडसे यांना श्रद्धांजली वाहिली.

ताराबाई गोडसे यांच्या निधनाने गणेश भक्तांवर शोककळा पसरली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.