Pune Tata motors : टाटा मोटर्सच्या पुण्यातील कारखान्यात विकसित करणार 4 एमडब्ल्यूपी क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प

एमपीसी न्यूज : टाटा मोटर्सने आपल्या पुण्यातील व्यावसायिक वाहन उत्पादन कारखान्यातील ऑन-साइट सौरऊर्जा प्रकल्पाची क्षमता वाढवून 9 एमडब्ल्यूपी केली आहे. (Pune Tata motors) या प्रकल्पातून विजेची 5.8  दशलक्ष एकके निर्माण होतील, यामुळे सुमारे 10 लाख टनांहून अधिक सीओटू उत्सर्जन कमी होऊ शकेल; हे एका आयुष्यात 16 लाख सागाची झाडे लावण्यासारखे आहे.

टाटा समूहाचे शाश्वत उत्पादनाला बढावा देण्याचे वचन अधोरेखित करत, टाटा मोटर्स व टाटा पॉवर यांनी टाटा मोटर्सच्या पुणे येथील व्यावसायिक वाहन उत्पादन कारखान्यात 4 मेगावॉट पीक क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासाठी, ऊर्जा खरेदी करार (पॉवर पर्चेस अग्रीमेंट अर्थात पीपीए) केला आहे.

स्थितीस्थापक व शाश्वत भविष्यकाळ निर्माण करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.(Pune Tata motors) या प्रकल्पातून विजेची एकूण 5.8 दशलक्ष एकके निर्माण होणे अपेक्षित आहे, यामुळे 10 लाख टनांहून अधिक कार्बन उत्सर्जन टाळणे जाणार आहे. हे एका आयुष्यभरात 16 लाखांहून अधिक सागाची झाडे लावण्यासारखेच आहे.

टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहन उत्पादन कारखान्यातील प्लाण्ट हेड अलोक कुमार सिंग म्हणाले की, “कार्बन वायू उत्सर्जन कमी करून नेट झिरो एमिशन उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो. व्यवसायाची शाश्वत वाढ करण्याच्या दृष्टीने नूतनीकरणीय ऊर्जेचा वापर करण्याचे वेगवेगळे मार्ग व व्यवसाय प्रारूपे आम्ही शोधत असतो.(Pune Tata motors) आर्थिक वर्ष 2022 मध्ये टाटाच्या सीव्ही पुणे कारखान्यात नूतनीकरणीय ऊर्जेचे एकूण योगदान 32 टक्के होते. या करारामुळे आम्ही नूतनीकरणीय ऊर्जेची 100 टक्के क्षमता उपयोगात आणण्याच्या आमच्या उद्दिष्टाच्या आणखी जवळ पोहोचलो आहे.”

Raje Umaji Naik : आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जीवनकार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्थिक वर्ष 2022 पर्यंत, टाटा मोटर्सने आपल्या पुणे कारखान्यातील प्रवासी व व्यावसायिक वाहन उत्पादन आस्थापनांमध्ये 15 एमडब्ल्यूपी क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केलेला होता आणि त्यातून 21 दशलक्ष किलोवॅट/प्रति तास ऊर्जा निर्माण होत आहे.(Pune Tata motors) पुढील काही वर्षांत  पुणे कारखान्यातील सौरऊर्जा क्षमतेचा विस्तार करून नूतनीकरणीय ऊर्जेची वाढती मागणी पूर्ण करण्याची कंपनीची योजना आहे.

टाटा पॉवरच्या सोलार रूफटॉप विभागाचे प्रमुख शिवराम बिकिना म्हणाले, “पुणे उत्पादन कारखान्यातील या 4 एमडब्ल्यूपी ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून टाटा मोटर्सला पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढवण्यामध्ये सहयोग करणार आहे. ताना टाटा पॉवरच्या सर्व सहयोगींसोबत काम करून त्यांचे कामकाज पर्यावरणपूरक व शाश्वत करण्याच्या दृष्टीने पर्यावरणपूरक ऊर्जेचे पर्याय निर्माण करण्यास आम्ही बांधील आहोत, असेही बिकिना म्हणाले.

टाटा मोटर्सने आरई करारावर स्वाक्षरी केलेली असून, आपल्या कामकाजात 100 टक्के नूतनीकरणीय ऊर्जा वापरण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.कामासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेतील नूतनीकरणीय ऊर्जेचा वाटा हळूहळू वाढवून हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने कंपनीने बरीच वाटचाल केली आहे.(Pune Tata motors) आर्थिक वर्ष 22 मध्ये, भारतातील आपल्या सर्व कारखान्यांमध्ये मिळून, कंपनीने 92.39 दशलक्ष केडब्ल्यूएच नूतनीकरणीय ऊर्जा निर्माण केली व उत्पादनासाठी उपयोगात आणली. ही ऊर्जा, सध्या कंपनी करत असलेल्या एकूण ऊर्जावापराच्या, 19.4 टक्के आहे. यामुळे 72 हजार 992 मेट्रिक टन्स कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन टाळले गेले आणि 27.37 कोटी रुपयांची आर्थिक बचतही झाली.

टाटा पॉवरने अनेक मोठ्या सोलार रूफटॉप सोल्यूशन्सच्या माध्यमातून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे व अनुभवही प्राप्त केला आहे. यात जगातील एका स्थळावरील सर्वांत मोठ्या रूफटॉप प्रकल्पांपैकी एक असलेल्या अमृतसर येथील राधास्वामी सत्संग बियास (आरएसएसबी) येथील रुफटॉप प्रकल्पाचा समावेश होतो; कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 2.67 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाचा समावेश होतो.

कंपनीने मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (सीसीआय) क्रिकेट स्टेडियमवर 820.8 केडब्ल्यूपी क्षमतेचा, क्रिकेट स्टेडियमवरील जगातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला आहे; बेंगळुरू येथील डेलटेक्नोलॉजीज येथे सोलर व्हर्टिकल फार्म (120 किलोवॅट) ही अनन्यसाधारण स्थापना कंपनीने केली आहे आणि नेल्लोर येथील टाटा केमिकल्समध्ये 1.4 मेगावॅट फ्लोटिंग (तरल) सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला आहे.(Pune Tata motors) याशिवाय, टाटा पॉवर भारतभरात विस्तृत निवासी रूफटॉप कार्यक्रम राबवत आहे, जेणेकरून सौरऊर्जेच्या माध्यमातून होणाऱ्या बचतीच्या लाभांविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.