Pune : पुण्यातील पर्यावरण संरक्षणासाठी ‘टाटा मोटर्स’ सातत्याने प्रयत्नशील; वारजे भागात 50 हजारांहून अधिक एतद्देशीय रोपांची लागवड

Tata Motors is constantly striving to protect the environment in Pune; Planting of more than 50,000 indigenous saplings in Warje area : पुण्यातील पर्यावरण संरक्षणासाठी 'टाटा मोटर्स' सातत्याने प्रयत्नशील; वारजे भागात 50 हजारांहून अधिक एतद्देशीय रोपांची लागवड

एमपीसी न्यूज – नागरी जंगले आणि नागरी वृक्ष आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी लाभकारक आहेत. स्थानिक समुदायांना यातून अनेक फायदे मिळतात, या सिद्धांताला संशोधनांमधून अधिकाधिक बळकटी प्राप्त होत आहे,  हे लक्षात घेऊन टाटा मोटर्सने पुण्यातील वारजे भागात काही वर्षांपूर्वी अर्बन फॉरेस्ट्रीची संकल्पना प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यास सुरुवात केली. 2015 पासून टाटा मोटर्सच्या 2000 हून अधिक स्वयंसेवकांनी वारजे भागात 50,000 हून अधिक एतद्देशीय रोपांची लागवड केली आहे आणि यातील 98 टक्के चांगली वाढत आहेत.

यासाठी कंपनीने टेक्नोलॉजी, एज्युकेशन, रिसर्च अँड रिहॅब्लिटेशन फॉर द एन्व्हॉर्न्मेंट अर्थात टेरी पॉलिसी सेंटरच्या सहयोगाने हे काम सुरू केले. टेरी ही पर्यावरणविषयक काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. 40 एकरांच्या एका पडीक भूखंडावर सुरू झालेल्या या प्रकल्पाला केवळ 3 वर्षांच्या काळात प्रचंड यश मिळाले.

मग त्याची व्याप्ती 100 एकर जागेपर्यंत वाढवण्यात आली. या जागेचे रूपांतर टवटवीत हिरवाईत झाले. सुक्ष्म जिवांचे ते वसतिस्थान (मायक्रो-हबिटट) झाले आणि स्थानिक समुदायांसाठी विरंगुळ्याचे स्थान झाले.

2015 पासून टाटा मोटर्सच्या 2000 हून अधिक स्वयंसेवकांनी वारजे भागात 50,000 हून अधिक एतद्देशीय रोपांची लागवड केली आहे आणि यातील 98 टक्के चांगली वाढत आहेत. 40 टक्के जागेला छताचे आच्छादन असलेली वारजे अर्बन फॉरेस्ट्री जैवविविधतेने समृद्ध आहे.

प्राणी व सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 10 प्रजाती, पक्ष्यांच्या (एव्हियन) 50 प्रजाती, कीटकांच्या 200 प्रजाती आणि वनस्पतींच्या 15 प्रजाती येथे आहेत. या वाढीव हिरवाईमुळे शहराला ताजी व स्वच्छ हवा मिळते.

या हिरवाईमुळे वर्षाचे एकंदर ऑक्सिजन उत्सर्जन 7 लाख किलोंपर्यंत वाढले आहे आणि 3 लाख किलोंपर्यंत कार्बन शोषून घेतला जातो (सिक्वेस्ट्रेशन). याशिवाय या प्रकल्पाने जमिनीची धूप 130 टक्क्यांनी कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like