Pune : टाटा मोटर्स पीएमपीएमएलला पुढील चार महिन्यात देणार 400 बस

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएलच्या ताफ्यात सीएनजी बसेसची वाढ करण्यात येणार आहे. त्यासाठी टाटा मोटर्स ही कंपनी बस पुरविणार आहे. पीएमपीएमएल कडून अंतरित चाचणी झाल्यानंतर 74 बसेस ह्या पुण्याकडे पाठविण्यात आल्या असून पुढील चार महिन्यात देणार 400 बस देण्यात येणार आहेत.

टाटा मोटर्स लि. च्या अधिकृत प्रवक्त्याने पीएमपीएमएलच्या सीएनजी बसेस बाबत म्हटले की, पीएमपीएमएल या एका मोठ्या मानांकित ग्राहकाशी संलग्न असण्याचा टाटा मोटर्सला अभिमान आहे. कंपनीला ही निविदा मिळाल्यानंतर ती पूर्णत्वास नेण्यास आणि वेळेत काम पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.

निविदेप्रमाणे बसेसचे उत्पादन हे कंपनीच्या लखनऊ कारखान्यात होत आहे. तसेच निविदेमध्ये नमूद केलेल्या सूचनांप्रमाणे बसेसची निर्मिती करण्यात येत आहे. दरम्यानच्या कालावधीत पीएमपीएमएलकडून अनेक वेळा चालू असलेल्या कामामध्ये चाचण्या घेण्यात आल्या. पीएमपीएमएलकडून घेण्यात आलेल्या चाचण्यांनंतर सुचविण्यात आलेले बदल व अतिरिक्त गोष्टींचा समावेश कंपनीकडून करण्यात आला. पीएमपीएमएल कडून अंतरित चाचणी झाल्यानंतर 74 बसेस ह्या पुण्याकडे पाठविण्यात आल्या आहेत. पुढील आठवड्यापासून पुढील पुरवठा चालू करण्यात येणार आहे. पुढील चार महिन्यात देणार 400 बस देण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like