Pune: शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, कोंढवा परिसरातील घटना

Pune: Teacher rapes minor girl, incident in Kondhwa area मागील वर्षी आरोपी तिचा कॉलेजमध्ये करियर गाईडलाईन विषयावर लेक्चर घेण्यासाठी गेला होता. तेव्हा त्यांची ओळख झाली होती.

एमपीसी न्यूज- पुण्यातील अल्पवयीन मुलीला तिच्या नेव्हीच्या कोर्सच्या व्यवस्था करतो असे सांगून एका 32 वर्षीय शिक्षकाने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. दि.10 जुलै रोजी कोंढव्यात हा प्रकार घडला. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून आरोपी मोसिन शेख (वय 32) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा एका करिअर गाईडलाईन संस्थेत शिक्षक म्हणून काम करतो. पीडित मुलीने यावर्षी बारावीची परीक्षा दिली आहे.

मागील वर्षी आरोपी तिचा कॉलेजमध्ये करियर गाईडलाईन विषयावर लेक्चर घेण्यासाठी गेला होता. तेव्हा त्यांची ओळख झाली होती. पीडित मुलीला नेव्हीमध्ये करिअर करायचे होते. त्यासाठी तिने आरोपीचा नंबर घेतला होता.

दरम्यान, चार जुलै रोजी पीडित मुलीने आरोपी मोसिन शेख याला फोन केला असता त्याने तिला कौसर बागेतील क्लासमध्ये येण्यास सांगितले. त्यानुसार पीडित मुलगी आईला घेऊन क्लासमध्ये गेली होती.

दरम्यान, आठ जुलैपासून क्लास सुरू झाल्यानंतरही ही मुलगी फीचे पैसे जमा न झाल्यामुळे क्लासला जाऊ शकली नाही.

ही मुलगी क्लासला न आल्यामुळे मोसिन शेख त्याने तिला पुन्हा एकदा बोलावून घेतले. तसेच फीची चिंता करू नको, मी पाहतो असे तिला सांगितले. आणि तिला घेऊन कोंढव्यातील एका मित्राच्या रूमवर गेला.

तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि हा प्रकार कुणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित मुलीने दुसऱ्या दिवशी झालेला सर्व प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आईने आरोपी विरोधात तक्रार दिली. कोंढवा पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.