Pune Teachers Constituency Voting : मतदानाचा टक्का वाढला; पुणे शिक्षक मतदार संघात दुपारी बारापर्यंत 26.25 टक्के मतदान

एमपीसी न्यूज – पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. सकाळी दहा वाजेपर्यंत पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये 11.38 टक्के मतदान झाले. तर दुपारी बारा वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढून 26.25 एवढी झाली. पहिल्या दोन तासांच्या तुलनेत दहा ते बारा या दोन तासात सुमारे चार टक्क्यांनी मतदानाची आकडेवारी वाढली आहे.

पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. पाच जिल्ह्यात 45 हजार 194 पुरुष तर 27 हजार 327 महिला मतदार आहेत. त्याचबरोबर 24 तृतीयपंथी शिक्षक मतदार आहेत. यातील 14 हजार 544 पुरुष तर 4 हजार 501 महिला मतदारांनी पहिल्या चार तासात (दुपारी बारा वाजेपर्यंत) मतदान केले आहे. एकूण 72 हजार 545 शिक्षक मतदारांपैकी 19 हजार 45 शिक्षक मतदारांनी बारा वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे.

दुपारी बारा वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाले. तर पुणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदान झाले आहे. एकूण 26.25 टक्के मतदान झाले आहे.

जिल्हावार झालेले मतदान –

पुणे (एकूण – 12 वाजेपर्यंत झालेले मतदान)
पुरुष – 15807 – 2666
महिला – 16371 – 1552
तृतीयपंथी – 23 – 0
एकूण – 32201 – 4218 (13.10 टक्के)

सातारा (एकूण – 12 वाजेपर्यंत झालेले मतदान)
पुरुष – 5121 – 1845
महिला – 2589 – 572
तृतीयपंथी – 1 – 0
एकूण – 7711 – 2417 (31.34 टक्के)

सांगली (एकूण – 12 वाजेपर्यंत झालेले मतदान)
पुरुष – 4826 – 1792
महिला – 1986 – 538
तृतीयपंथी – 0 – 0
एकूण – 6812 – 2330 (34.20 टक्के)

सोलापूर (एकूण – 12 वाजेपर्यंत झालेले मतदान)
पुरुष – 10561 – 4066
महिला – 3023 – 737
तृतीयपंथी – 0 – 0
एकूण – 13584 – 4803 (35.36 टक्के)

कोल्हापूर (एकूण – 12 वाजेपर्यंत झालेले मतदान)
पुरुष – 8879 – 4175
महिला – 3358 – 1102
तृतीयपंथी – 0 – 0
एकूण – 12237 – 5277 (43.12 टक्के)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.