सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

Pune : पुण्याचे कमाल तापमान 39.7 तर लोहगावचे 41.3 अंश

एमपीसी न्यूज – पुण्याचे आजचे कमाल तापमान 39.7 अंश तर लोहगावचे 41.3 अंश इतके नोंदवण्यात आले. पुणे वेधशाळेनुसार हे तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त आहे. तर राज्यात सर्वात जास्त तापमान हे चंद्रपूर शहरात 48.0 इतके नोंदवण्यात आले आहे.

उन्हाची तीव्रता अजूनही कमी झाली नसल्याने उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातही आज कमालीचा उकाडा जाणवत होता. तर लोहगावचे तापमान अजूनही 41 अंशावर रेंगाळले आहे.

चंद्रपूरनंतर ब्रह्मपुरी 47.5, अमरावती 46.4 तर अकोल्याचे तापमान 45.7 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे.

spot_img
Latest news
Related news