BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पिरंगुट अपघातातील मृतांची संख्या वाढली ; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिरंगुट घाटात झालेल्या अपघातामधील मृतांची संख्या वाढली असून उपचारादरम्यान आणखी एका युवकाचा मृत्यू झाला. भरधाव ट्रकने काही दुचाकींना धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर, दोघे गंभीर जखमी झाले. जखमींपैकी एकाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 10) मुळशी तालुक्यातील लवळे फाटा येथे पिरंगुट घाट उतारावर रात्री नऊच्या दरम्यान घडला.

नागेश अंकुश गव्हाणे (वय 21) पूजा बंडू पाटील (वय 17) वैष्णवी सुनील सोनवणे (वय 20) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. सुरज राठोड व विठ्ठल भिलारे हे दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी सुरज राठोड याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमीवर पिरंगुट येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, पिरंगुट घाट उतारावर मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरून काही दुचाकी जात होत्या. तेवढ्यात मागून येणार्‍या भरधाव वेगातील ट्रकने (एम एच 15 जी व्ही 9011) या दुचाकींना जोरदार धडक दिली. अपघातानंतर पळून जाणाऱ्या ट्रक चालकास घोटावडे फाटा येथे वाहतूक पोलीस मयूर निंबाळकर आणि इतर नागरिकांनी पकडले. हा ट्रकचालक दारू पिऊन ट्रक चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. वैष्णवी सोनवणे ही विप्रो या आयटी कंपनीत नोकरीला होती आणि पूजा पाटील इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

HB_POST_END_FTR-A2

.