Pune: खासदार गिरीश बापट यांच्या प्रयत्नामुळे सौदीतून174 जण भारतात सुखरूप परतले

Pune: Thanks to the efforts of MP Girish Bapat, 174 people returned safely to India गिरीश बापट यांनी तातडीने हालचाली करून परराष्ट्र मंत्रालयाच्या परवानग्या घेऊन विशेष विमानाने भारतात आणले.

एमपीसी न्यूज – सौदी अरेबिया मधील दमाम शहरातील 174 भारतीय नागरिक खासदार गिरीश बापट यांच्या प्रयत्नामुळे परत आपल्या घरी सुखरुप पोहोचू शकले.

सध्या लॉकडाऊनमुळे अनेक देशातून नागरिक भारतात परतत आहेत. या शहारातील लोकांना भारतात यायला काही अडचणी येत होत्या. त्यातल्या काहींनी खासदार गिरीश बापट यांना संपर्क केला.

बापट यांनी तातडीने हालचाली करून परराष्ट्र मंत्रालयाच्या परवानग्या घेऊन विशेष विमानाने भारतात आणले. यामध्ये प्रामुख्याने ठाणे, पुणे, नवी मुंबई तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील सुमारे 174 नागरिकांचा समावेश होता.

या लोकांना दमाम शहरातून परत आणण्यासाठी खासदार बापट यांच्या बरोबरच महाराष्ट्र मित्र मंडळाचे किरण आठवले, भूषण पवार आदींनी पुढाकार घेतला. या प्रवाशांचे गिरीश बापट यांनी मंगळवारी स्वागत केले.

आपल्या देशात आल्यावर या लोकांनी बापट यांचे आभार मानले. कोरोनाचे संकट संपूर्ण जगात निर्माण झाले आहे. या कालावधीत भारतीय नागरिकांना मोठ्याप्रमाणात आणण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.