Pune : छत्रपती संभाजी पोलीस चौकीवरील ‘तो’ नामफलक अखेर हटवला

एमपीसी न्यूज – संभाजी पुलाजवळील पोलीस चौकीचा ‘छ.संभाजी पोलीस चौकी’ हा नामफलक अखेर पोलिसांनी काढून टाकला आहे. काही दिवसांपूर्वी हा नाम फलक बदलून छत्रपती संभाजी पोलीस चौकी असा उल्लेख करावा, अशी मागणी ‘हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे संस्थापक तथा सभागृह नेते धीरज घाटे यांनी केली होती.

_MPC_DIR_MPU_II

छत्रपती ही पदवी श्रीमंत संभाजी महाराज यांनी स्वकर्तृत्वावर सार्थ करून दाखविली आहे. त्यांचा उल्लेख ‘छ. संभाजी’ असा करणे अपमानास्पद आहे. ‘छत्रपती संभाजी महाराज’ किंवा ‘छत्रपती संभाजी पोलीस चौकी’ असा गौरवपूर्ण आणि आदरपूर्ण उल्लेख नामफलकावर करावा, अशी विनंती त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज, शुक्रवारी या पोलीस चौकीवरील नामफलक पोलिसांकडून काढण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.