Pune : ‘त्या’ पोलीस चौकीचा ‘छत्रपती संभाजी पोलीस चौकी’ असा उल्लेख करावा -धीरज घाटे

एमपीसी न्यूज – ‘छ.संभाजी पोलीस चौकी’ हा नाम फलक बदलून छत्रपती संभाजी पोलीस चौकी असा उल्लेख करावा, अशी विनंती विश्रामबाग पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना केली आहे. तसेच, छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख आदरपूर्वक व्हावा, अशी मागणी ‘हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे संस्थापक तथा सभागृह नेते धीरज घाटे यांनी आज केली आहे.

यावेळी राजेंद्र फाटे, अमर आवळे, योगेश जावीर, अजिंक्य निवदेकर, पराग आंग्रे, सुमित गायकवाड, सुजित म्हस्के, क्रांती कर्डे, रोहित फासगे, विनोद आवडे, कृष्णा मोरे, ऋतिक साळुंके, गणेश केंगार, गणेश डोईफोडे, राहुल साळुंके उपस्थित होते.

चोवीस तासांच्या आतच चुकीच्या पद्धतीचा नामफलक पोलिसांनी व महापालिकेच्या विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाने काढून टाकला. लोकमान्य टिळक चौकातील छत्रपती संभाजी पोलिस चौकीचे नुकतेच नूतनीकरण झाले. नुतनीकरणानंतर पोलिस चौकीचे नाव नव्या फलकावर लावण्यात आले. त्यामध्ये हिंदवी स्वराज्याचे ‘दुसरे छत्रपती श्री. संभाजी महाराज’ यांचा अपमानास्पद आणि अपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे. छत्रपती संभाजी पोलीस चौकी असे लिहिण्यात आले आहे.

छत्रपती ही पदवी श्रीमंत संभाजी महाराज यांनी स्वकर्तृत्वावर सार्थ करून दाखविली आहे. त्यांचा उल्लेख ‘छ. संभाजी’ असा करणे अपमानास्पद आहे. ‘छत्रपती संभाजी महाराज’ किंवा ‘छत्रपती संभाजी पोलीस चौकी’ असा गौरवपूर्ण आणि आदरपूर्ण उल्लेख नामफलकावर करावा, अशी मागणी हिंदु गर्जना प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा कर्तृत्वाचा आपण मान राखावा आणि नामफलकात योग्य तो बदल करावा, असे प्रतिष्ठानतर्फे म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.