Pune : ‘त्या’ उपअभियंत्याला मनपा सेवेतून त्वरित निलंबित करून चौकशी करावी; माजी नगरसेवकांची मागणी

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेच्या (Pune) एका रोड विभागाच्या उपअभियंताकडे 50 हजार रुपयाची काही बंडल सापडली आहे. त्याचे video चित्रीकरण social media वर आहे. त्यामुळे या उपअभियंत्याला मनपा सेवेतून त्वरित निलंबित करून चौकशी करावी, अशी मागणी माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी केली आहे. त्या संदर्भातील निवेदन आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यात आले आहे.

पुणे महापालिकेत अशी 3 ते 4 जणांना बंडल वाटली अथवा ठेवायला दिली होती. अशा अधिकारी वर्गामुळे मनपाची प्रतिमा जन माणसात डागाळली जाते, असेही या नगरसेवकांनी निवेदनात म्हटले आहे.

Pune: पीएमपीएमएलच्या कामगारांसाठी सत्ताधारी शिवसेनेचे शहर प्रमुख आक्रमक, थेट व्यवस्थापकीय अध्यक्षांच्या दालनासमोरच मारली बैठक 

तर, या उपअभियंत्याला नोटीस दिली आहे. या घटनेचा  (Pune) संबंधित एचओडी रिपोर्ट देण्यास सांगण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारे चुकीचे काम खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.