Pune : चाकूचा धाक दाखवून सुमारे 43 लाख लुटणारे गजाआड; नाकाबंदी करून पोलिसांनी 5 जणांना पकडले

एमपीसी न्यूज – भरदुपारी चाकूचा धाक दाखवून दुचाकीवरून आलेल्यांनी चोरटयांनी सुमारे 43 लाख लुटले. हा प्रकार जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर येथे घडला. मात्र, पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी करून 5 जणांना पकडले असून त्यांच्याकडून पूर्ण सुमारे 43 लाखांची रोकडही जप्त केली आहे. यातील आरोपींची नावे अजून पूर्ण मिळली नसून आरोपींकडे चौकशी करण्यात येत आहे.

याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण जिल्हयातील वडगांव निंबाळकर हददीमध्ये आळेफाटा येथे आल्टोमधून आयसीआयसीआय बॅकेचे सुमारे 43 लाख रूपये घेऊन एटीएममध्ये भरणा करण्यासाठी जात होते. त्यावेळी पाठीमागून पल्सरवर आलेल्या 4 अनोळखी चोरटयांनी या कारच्या समोर दुचाकी उभ्या केल्या. तसेच चाकूचा धाक दाखवून सुमारे 43 लाखांची रोकड लुटली. यावेळी याची तत्काळ पुणे ग्रामीण पोलिसांच्या ‍नियंत्रण कक्षाला माहिती दिली. तसेच आळेफाटा पोलिसांना माहिती दिली.

त्यानंतर सहायक निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी आणि त्यांच्या पथकाने आणि स्थानिक गुन्हे शाखेने परिसरात नाकाबंदी केली. त्यावेळी दोघे बारामती रोडवर दोघांना नाकाबंदी दरम्यान पकडले गेले. तर, सुपागाव येथील कोंढवेवाडीत दोघांना आणि इतर ठिकाणी एकाला पकण्यात आले आहे. सुदैवाने या आरोपींकडून जागीच पूर्ण रोकड सापडली आहे. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. या दोघांकडे चौकशी करण्यात येत आहे. त्यांची नावे अजून पूर्ण मिळली नसून त्यांच्याकडे तपास करण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.