Pune : पुणेकरांवर कराचा बोजा…!; आयुक्त शेखर गायकवाड यांनी मांडला 2020 -21चा 6 हजार 229 कोटींचा अर्थसंकल्प

536 कोटी रुपयांची तरतूद कमी; मिळकत कर 12 टक्के तर, 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत पाणीपट्टीत 15 टक्के वाढ

एमपीसी न्यूज – पुणे शहराच्या विकासाची दिशा दर्शविणारा सुमारे 6 हजार 229 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका नवनियुक्त आयुक्त शेखर गायकवाड यांनी आज (सोमवारी) मांडला. 2020 – 21 या वर्षात त्याची अंमलबजावणी होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 536 कोटी रुपयांनी अंदाजपत्रकात तरतूद कमी झाली आहे. मिळकतकर 12 टक्के तर, 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत 15 टक्के वाढ करण्यात आली आहे. पुणेकरांवर करवाढ करण्यात येणारे हे बजेट आहे. कोणतीही करवाढ करण्यात येणार नसल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या बजेटमध्ये पुणेकरांना दिलासा मिळणार का?, याची उत्सुकता आहे.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, अतिरीक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शंतनू गोयल, नगरसचिव सुनील पारखी, दरम्यान, यावेळी सर्वोपक्षीय नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात दांडी मारली. हातावर मोजण्याएवढेच नगरसेवकांची उपस्थिती होती.

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 10 हजार घरांची निर्मिती, वाहतूककोंडी सोडविणे, पुढील 50 वर्षे मेट्रोचे नियोजन करणे, त्यासाठी जागा विकत घेणे, महापालिकेची आर्थिक स्थिती उत्तम करणे, उत्पन्नात वाढ करणे, 1261 कोटी समान पाणीपुरवठा योजनेसाठी तरतूद, भामा – असखेड योजना 2020 – 21 मध्ये पूर्ण करणे, अशा अनेक महत्वपूर्ण योजनांची घोषणा आयुक्तांनी बजेटमध्ये केली आहे.

जायका प्रकल्प आगामी 3 वर्षात पूर्ण करणे, समाविष्ट 11 गावांतील समस्या सोडविणे, आंबील ओढा, घनकचरा व्यवस्थापन 585 कोटी तरतूद, उपनगरात निर्माण होणार कचरा त्याच भागात जिरविला जावा, आरोग्य महसूल तरतूद 325 कोटी, महापालिकेचे सुसज्ज रुग्णालय, गावांत टीपी स्कीम राबविणे, गावांचा विकास आराखडा, गावातील शाळा हस्तांतरण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

चांदनी चौक उड्डाणपूल परिसरात लाईट, पाणी ड्रेनेजची व्यवस्था नॅशनल हायवे करणार आहे. पुणे शहरात विविध ठिकाणी वाहनतळ विकसित करणे, साखर संकुलमध्ये एक हजार वाहने बसवू शकतात, असे मॉडेल शहरात राबवायचे आहे. प्रत्येक सूचनेची प्रशासन दाखल घेईल.

पुणे मेट्रो समन्वय साधून पुढे जाण्याची गरज, 1950 सलीच मेट्रो गरजेची होती. अजून 2 ते 3 ठिकाणी मेट्रो मार्ग व्हावे. 50 मार्ग सुचवा, आज जमिनिची किंमत कमी द्यावी लागेल, शिवसृष्टी पर्यंत मेट्रो जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सायकलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढवायचा आहे. कन्टीन्यू सायकल ट्रॅक हवा.

बालगंधर्व पुनर्निर्माण, प्राथमिक शिक्षणासाठी 345 कोटी, माध्यमिक शिक्षण 72 कोटी, गरिबविध्यार्थ्यांच्या घरी कम्प्युटर पोहोचले पाहिजे, विशेष मुलांची शाळा, खासगी शाळांतून जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी संख्या वाढत आहे. त्याच प्रकारे महापालिकेच्या शाळा डिजीटीलयझेशन करण्यावर भर देणार आहे, अशा अनेक घोषणांचा पाऊस आयुक्तांनी त्याच्या बजेटमध्ये मांडला.

आता या बजेटवर स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि सदस्य अभ्यास करणार आहेत. त्यानंतर रासने बजेट मांडणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.