Pune : जनता वसाहतीतील गॅंगवारमधून झालेल्या खून प्रकरणातील आरोपी गजाआड

युनिट-१, गुन्हे शाखा, पुणे शहरची कामगिरी

एमपीसी न्यूज – पुण्यातील जनता वसाहत दत्तवाडी येथे दोन गॅंगवारमधून झालेल्या खुनातील एका आरोपीला युनिट-1, गुन्हे शाखा, पुणे शहरने गजाआड केले. रेकॉर्डवरील गुन्हेगार निलेश वाडकर याचा सुनिल ऊर्फ चॉकलेट डोईफोडे आणि त्याचे साथिदार यांनी खून 13 जानेवारी 2019 रोजी केला होता.

याप्रकरणी पोलिसांनी अविनाश सुनिल देवकुळे (वय 24 वर्ष, व्यवसाय- मजुरी, रा जय भवानी नगर, गल्ली नं -8, पर्वती पायथा, पुणे) याला अटक केली आहे.

  • याबाबत मिळालेली माहिती अशी, जनता वसाहत दत्तवाडी, पुणे येथे दोन गॅंगमध्ये झालेल्या मारामारीत रेकॉर्डवरील गुन्हेगार निलेश वाडकर याचा सुनिल ऊर्फ चॉकलेट डोईफोडे आणि त्याचे साथिदार यांनी खून केला होता. याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून पोलीस आरोपींचा शोध घेत होते.

आरोपींबाबत शोध घेत असताना युनिट -1 पथकातील पोलीस कर्मचारी सचिन जाधव यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, दाखल गुन्हयात आरोपी अविनाश देवकुळे (रा जनता वसाहत) हा ससून हॉस्पिटल गेटजवळ चहाचे हातगाडीवर उभा आहे. याबाबत वरिष्ठांना कळवून युनिट-१ कडील अधिकारी आणि कर्मचारी यांनी सापळा रचून त्यास ससून हॉस्पीटल गेटजवळ पुणे येथे ताब्यात घेतले. त्यास त्याचा नाव पत्ता विचारता, त्याने त्याचे नाव आणि पत्ता अविनाश सुनिल देवकुळे (वय 24 वर्ष, व्यवसाय- मजुरी, रा जय भवानीनगर, गल्ली नं -8, पर्वती पायथा, पुणे) असे असल्याचे सांगितले.

  • त्यास दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयाचे बाबत विचारपूस केली असता दाखल गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे त्याने कबुल केले आहे. त्यास ताब्यात घेऊन दाखल गुन्ह्याच्या पुढील कारवाईसाठी दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

हि कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस अधिकारी गुन्हे-1, समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे युनिट-1 विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत शिंदे, दिनेश पाटील, पोलीस कर्मचारी सचिन जाधव, बाबा चव्हाण, सुधाकर माने, तुषार माळवदकर, सुभाष पिंगळे, विजेसिंग वसावे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.