Pune : कोरोनाची लढाई दीर्घकाळ चालणारी, केंद्राची थेट मदत हवी; पृथ्वीराज चव्हाण यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

The battle of Corona is a long-running one, requiring direct help from the center; Prithviraj Chavan's attack on Modi government

एमपीसी न्यूज – कोरोना लढाई दीर्घकाळ चालणारी आहे. त्यासाठी केंद्र सरकारची थेट मदत हवी, सल्ले नको, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुणे मनपा हॉस्पिटल्सचे ‘ कोरोना योद्धा’रुपी डॉक्टर्स, नर्सेस, मेडिकल स्टाफ यांना प्रतिबंधात्मक साहित्य पीपीई किट्स, एन ९५ – मास्क, सॅनिटायझर बाटल्या, रोग प्रतिकारकशक्ती वाढविणाऱ्या गोळ्या वाटप करण्यात आले.

त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कमला नेहरू हॉस्पिटलचे डाॅ. मंदार नागमोडे, राजीव जगताप, सुर्यकांत मारणे, भाऊ शेडगे, रवी मोहिते, राजेंद्र खराडे, प्रसन्न पाटील, जयसिंग भोसले, गौरव बोराडे, योगेश भोकरे, महेश अंबिके, नितीन पायगुडे, संजय अभंग, अशोक काळे, शंकर शिर्के, गणेश कुरे, आशिष गुंजाळ उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, कोरोनामुळे अर्थचक्राचा वेग मंदावला आहे. त्याकरीता व्यक्तिगत प्रतिकार शक्ती, शारीरिक पथ्ये या बरोबरच सामाजातील “अर्थकारणाची पोकळी” भरून काढण्यासाठी सरकारने कृती केली पाहिजे.

त्या करिता तातडीने रोजंदारीवर पोट असणाऱ्यांसाठी थेट अर्थ सहाय्य दिले पाहिजे; अन्यथा “रोजगाराच्या चक्रात, सामाजिक वावर व अंतर पाळण्याची पथ्ये गरिबांना पाळता येणार नाहीत, असा इशाराही चव्हाण यांनी दिला.

जनतेला पोकळ सल्ले देवून काम भागणार नाही, त्यासाठी थेट मदत करा, असा सल्लाही त्यांनी केंद्र सरकला दिला.

या कार्यक्रमाचे आयोजन ‘राजीव गांधी स्मारक समिती’ व गोपाळ तिवारी मित्र परिवार यांच्यातर्फे करण्यात आले होते.

प्रास्ताविक गोपाळ तिवारी यांनी केले. स्वागत सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी केले. राजेंद्र खराडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.