Pune : वडगावशेरी मतदारसंघात पराभव झाल्यानंतर भाजपचे नगरसेवक खडबडून जागे

भामा-आसखेड योजना मार्गी लावण्यासाठी भाजप नगरसेवक योगेश मुळीक यांचा पुढाकार

एमपीसी न्यूज – वडगावशेरी मतदारसंघात भाजपचे आमदार जगदीश मुळीक यांचा पराभव झाल्यानंतर भाजपचे नगरसेवक खळबळून जागे झाले. आज महापालिका सर्वसाधारण सभेत त्याचे पडसाद उमटले. आमदार बंधू, नगरसेवक योगेश मुळीक यांनी भामा-आसखेडची योजना कधी पूर्ण होणार?, असा सवाल उपस्थित केला.

प्रशासनाने केवळ आश्वासने दिली. 185 कोटी रुपये तरतूद करण्यात आली. 45 किलोमीटर लाईनचे काम पूर्ण झाले आहे. 3 किलोमीटर लाईन टाकायची आहे. 380 कोटी रुपये किमतीची ही योजना आहे. 90 टक्के काम डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण होणार असून, 31 मार्च 2020 पर्यंत ही योजना पूर्ण होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले. 6 टप्यात ही योजना पूर्ण होणार आहे.

भामा – आसखेड योजनेचे काम करताना अडथळा आणत असल्याने महापालिका आयुक्त पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार आहेत. पुणे आणि पिंपरी – चिंचवड महापालिकेने 45 कोटी रुपये मदत केली आहे. आणखी 25 कोटी रुपये देण्यासाठी स्थायी समितीला प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.

2019 – 20 च्या अंदाजपत्रकात निधीची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची एवढी जागा जाते, एवढा मोबदला, असे जाहीर केले का? अशी विचारणा स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप यांनी केली असता, शेतकऱ्यांना हेक्टरी 15 लाख मदत जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत मदत मिळणार असल्याचे कुलकर्णी म्हणाले.

दरम्यान, वडगावशेरी मतदारसंघात आमदार जगदीश मुळीक यांचा राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील टिंगरे यांनी नुकताच पराभव केला. त्यामुळे भाजप नगरसेवकांत आता धाकधूक वाढली आहे. येत्या 2 वर्षांतच पुणे महापालिकेची निवडणूक होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.