Pune : पॅरोलवर सुटून बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून

Criminal Murder in hadapsar ramtekdi who was released on parole : पैतरसिंग हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्याविरोधात घरफोडी आणि शरीराविरुद्धचे 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

एमपीसीन्यूज : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत पॅरोलवर सुटून बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. हडपसर परिसरातील रामटेकडी येथे गुरुवारी रात्री ही घटना घडली.

पैतरसिंग टाक (19) असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. या प्रकरणी सहा आरोपींविरोधात वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैतरसिंग हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्याविरोधात घरफोडी आणि शरीराविरुद्धचे 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री पैतर सिंग मित्रांसह रामटेकडी परिसरात गप्पा मारत उभा होता. यावेळी तेथे आलेल्या आरोपींनी कोयत्याने व धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले.

यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

वानवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.