Pune : आईवर चोरीचा आळ घेतला म्हणून व्यावसायिकावर केले कोयत्याने वार, आरोपीला अटक

एमपीसी न्यूज –  आईवर चोरीचा आरोप घेत ( Pune) अपमान केला म्हणून आरोपीने शनिवारी (दि.2) एका व्यावसायीकावर कोयत्याने वार केले होते. ही घटना पुण्यातील लष्कर परिसरात घडली होती. गुन्हे शाखेने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

युवराज अनिल गोरखे (वय 24, रा. वैदुवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी साथीदार सार्थक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय विमलचंद मेहता (वय 38, रा. कुमार कॅसल सोसायटी, कॉन्व्हेंट स्ट्रीट, लष्कर) असे जखमी झालेल्या सराफाचे नाव आहे. याबाबत मेहता यांचा भाऊ मनोज (39) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri : पीसीईटीच्या रेडीओचा ‘कम्युनिटी रेडिओ एक्सेलन्स’ पुरस्कार देऊन गौरव 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोरखे याच्याविरुद्ध यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्याची आई मेहता यांच्याकडे कामाला होती. विजय आणि गोरखेची आई यांच्यात वाद झाला होता. विजय यांनी आईवर चोरीचा आरोप केला होता. आईचा अपमान केल्याने गोरखे चिडला होता. शनिवारी रात्री विजय यांना आरोपींनी लष्कर भागातील सेंटर स्ट्रीट परिसरात अडवले.

गोरखे आणि साथीदाराने त्यांच्यावर कोयता उगारला. विजय घाबरून पळाले. आरोपींनी पाठलाग करुन त्यांच्यावर कोयत्याने वार केले. पसार झालेल्या गोरखेला पोलिसांनी अटक केली. आईचा अपमान केल्याने त्याने विजय यांच्यावर हल्ला केल्याची कबुली दिली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक प्रियंका शेळके ( Pune)  तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.