Pune : उमेदवारांच्या पायाला भिंगरी, कार्यकर्त्यांची चंगळ; प्रचारासाठी उरले केवळ 12 दिवस

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीत प्रचार करण्यासाठी उमेदवारांनी पायाला भिंगरी लावल्याचे चित्र मतदारसंघांत दिसून येत आहे. उमेदवारांचे नातेवाईकही घरोघरी, सोसायटीत जाऊन प्रचार करीत आहेत. विशेषतः चार-पाच मजली इमारतीला लिफ्ट नसल्यास मोठी दमछाक होत असल्याचे या नातेवाईकांनी सांगितले. प्रचारासाठी आता केवळ 12 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. 

उमेदवारांनी प्रचाराचे नियोजन केले आहे. 4 ते 5 लाख मतदार मतदारसंघात आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप – शिवसेना युती, मनसे उमेदवारांनी आता प्रचारात आघाडी घेतली आहे. उमेदवार रात्री 2 पर्यंत जागरण करत आहेत. केवळ 2 ते 3 तासच झोप घेत असल्याचे काही उमेदवारांनी सांगितले.

सकाळी आणि सायंकाळी प्रचार संपल्यावर रात्री 11 वाजता उद्या काय नियोजन करायचे?, यावर कार्यकर्त्यांची बैठक होते. आपलाच उमेदवार विजयी व्हावा, यासाठी कार्यकर्त्यांनीही जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. सध्या कार्यकर्तायांची चांगलीच चंगळ सुरू आहे.

प्रचारासाठी आता केवळ 12 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. 19 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजता प्रचार थांबणार आहे. 21 ऑक्टोबरला मतदान तर, 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.