Pune : शहरात आजही 1159 रुग्ण कोरोना मुक्त; 1101 नवे रुग्ण, 17 कोरोनाबाधितांचा मृत्यू

675 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 425 जण व्हेंटिलेटरवर आहेत. ; The city still has 1159 corona free today; 1101 new patients, 17 deaths

एमपीसी न्यूज – पुणे शहरात बुधवारीही कोरोनाच्या आजारातून 1159 रुग्ण मुक्त झाले. 5 हजार 698 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1101 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर 17 जणांचा मृत्यू झाला. 675 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 425 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

कोरोनाचे पुणे शहरात 60 हजार 597 रुग्ण झाले आहेत. 42 हजार 410 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे.

आतापर्यंत या कोरोनामुळे 1 हजार 429 नागरिकांचा मृत्यू झाला. शहरात 16 हजार 758 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

हडपसरमधील 76 वर्षीय पुरुषाचा कमांड हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 80 वर्षीय पुरुषाचा, भवानी पेठेतील 46 वर्षीय पुरुषाचा, येरवड्यातील 65 वर्षीय महिलेचा, नाना पेठेतील 70 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

धायरीतील 58 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, धनकवडीतील 65 वर्षीय महिलेचा, सिंहगड रोडवरील 61 वर्षीय महिलेचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, आंबेगावमधील 54 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 50 वर्षीय पुरुषाचा, बिबवेवाडीतील 49 वर्षीय पुरुषाचा, हडपसरमधील 41 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

शिवणेतील 53 वर्षीय पुरुषाचा पुना हॉस्पिटलमध्ये, कोंढाव्यातील 70 वर्षीय पुरुषाचा ताराचंद हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 75 वर्षीय महिलेचा दळवी हॉस्पिटलमध्ये, धनकवडीतील 67 वर्षीय महिलेचा मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये, विश्रांतवाडीतील 67 वर्षीय महिलेचा नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.