Pune : शहरात आणखी काही दिवस लॉकडाऊन वाढवावे लागेल : महापौर

एमपीसी न्यूज – पुण्याच्या पूर्व भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. तर इतर विभाग ग्रीन, ऑरेंज झोन आहेत. मात्र, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शहरात आणखी काही दिवस लॉकडाऊन वाढवावे लागेल, अशी माहिती असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

शहरातील मध्य वस्तीतील भवानी पेठ, कसबा – विश्रामबागवाडा, शिवाजीनगर – घोले रोड, ढोले पाटील रोड, येरवडा या भागांत दाटीवाटीने राहणाऱ्या झोपडपट्ट्यात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन, पोलीस यंत्रणा चांगले काम करीत आहे. त्यामुळे येत्या 8 ते 10 दिवसांत या भागांतील कोरोनाचे रुग्ण कमी होणार असल्याचा विश्वासही महापौरांनी व्यक्त केला.

_MPC_DIR_MPU_II

9 मार्च रोजी पुण्यात कोरोनाचा परदेशातून आलेला पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर 15 दिवस याच लोकांच्या संपर्कातील रुग्ण आढळून येत होते. नंतर मात्र फार कमी वेळात झोपडपट्ट्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागले.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पुणे महापालिका सक्षम आहे. महापालिकेकडे पुरेसे आरोग्य कर्मचारी, साहित्य उपलब्ध आहे. आणखी 3 हजार आयसोलेशन आणि 14 हजार कोरोंटाईन रुग्णांची क्षमता वाढविण्यात आली आहे. संपूर्ण पुणे शहर सील करण्यात आले असून, लवकरच कोरोनाचे संकट परतावून लावू, असा विश्वासही महापौर मोहोळ यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.